Pune Crime News : पुणे शहरात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. यादरम्यान सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्या अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
पुण्यातील रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या एका महिलेवर फूटपाथवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिली ही भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करते. दमरम्यान फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात ती कुटुंबासह राहते. 25 एप्रिलच्या रात्री जेवण करुन फूटपाथवर झोपलेल्या असताना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यावर अत्याचार केला.
30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण प्रकारानंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.