justice bg kolse patil narendra modi esakal
पुणे

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० लाख कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता जाणार, हे नक्की आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहजासहजी जाता येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता जाणार, हे नक्की आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहजासहजी जाता येणार नाही. त्यांना जनतेला ३०० लाख कोटी रुपयांचा हिशोब द्यावा लागेल’, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ‘‘जनतेत मोदी व भाजप विरोधी लाट आहे’, असे मत या वेळी महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सोशालिस्ट पार्टीचे (इंडिया) राष्ट्रीय नेते डॉ. अभिजित वैद्य, काँग्रेसचे पुणे लोकसभा प्रचारप्रमुख मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘आम्ही विकास केला असल्याने मते मागायला जाण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत गल्लोगल्ली जाऊन प्रचार करावा लागला. यातच जनतेचा विजय झाला आहे. नागपूरमध्ये जनतेने भाजपला नाकारले असून मी एक लाख मतांनी विजयी होईल.’

डॉ. वैद्य म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पराभवाची भीती भेडसावत असल्यामुळेच ते द्वेषमूलक वक्तव्ये आहेत. यातून ते देशाच्या एकात्मतेलाच धक्का लावत आहेत. पण निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. मतदानाची टक्केवारी वाढवली जात असून ही चिंतेची बाब आहे. मात्र कितीही टक्केवारी वाढवली तरी ते १५० जागाही पार करणार नाहीत.’

‘करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले नाही’

‘हेमंत करकरे यांना लागलेल्या गोळ्या कसाब आणि इस्माईलच्या बंदुकांमधील नाहीत, असे न्यायालयाच्या निकालपत्रातच नमूद केले आहे. करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले नसून त्यांना लागलेल्या गोळ्या पोलिसांच्या पिस्तुलातील होत्या’, असा आरोप बी. जी. कोळसे पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

SCROLL FOR NEXT