panjab1
panjab1 
पुणे

दिलासादायक! पंजाबमध्ये अडकलेल्या 300 विद्यार्थ्यांची अखेर सुटका...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पंजाबमधल्या जालंधरमध्ये एका व्यावसायिक प्रशिक्षण विद्यापीठात महाराष्ट्रातले 300 विद्यार्थी शिकतात. लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. 

लॉकडाऊनमुळे पंजाबमध्ये अडकून पडलेल्या 300 विद्यार्थ्यांची सुटका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या सोनिया दुहन यांची टीम तातडीनं त्या ठिकाणी पोहचली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

जालंधरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनाशी बैठका केल्या. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत त्यांना बसेसची उपलब्धता करून दिली. विशेष म्हणजे यातल्या सर्व बसेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या खासगी बसेस होत्या. दोन्ही राज्य सरकारांच्या विशेष परवानगीने या बसेसमधून आता विद्यार्थ्यांचा त्यांच्या घराच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT