Crime News esakal
पुणे

Pune Crime : व्यापाऱ्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींकडून दोन पिस्तुलांसह ३१ जिवंत काडतुसे जप्त

स्वारगेट परिसरात तंबाखू व्यापारी लतेश हसमुखलाल सुरतवाला यांच्यावर गोळीबार करणार्‍या अन्य तीन आरोपींना गुन्हे शाखेतील युनिट- दोनच्या पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वारगेट परिसरात तंबाखू व्यापारी लतेश हसमुखलाल सुरतवाला यांच्यावर गोळीबार करणार्‍या अन्य तीन आरोपींना गुन्हे शाखेतील युनिट- दोनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह ३१ जिवंत काडतुसे आणि तीन लाख ५२ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

अभयकुमार सुबोधकुमार सिंग (वय २३, रा. मार्केटयार्ड, पुणे), नितीशकुमार रमाकांत सिंग (वय २२, रा. मार्केटयार्ड, पुणे. दोघे मूळ रा. रामदिरी गाव, बुगुसरा, मटिहाणी ठाणा, बिहार) आणि मोहम्मद बिलाल शेख (वय २८, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंचजवळ नाना पेठेतील तंबाखू व्यापारी लतेश सुरतवाला (वय ५१, रा. सिंहगड रस्ता) यांच्यावर गोळीबार करून त्यांच्याकडील चार लाखांची रोकड चोरट्यांनी लुटून नेली होती. १९ जुलै रोजी रात्री या घटनेत सुरतवाला यांच्या पाठीत आणि मांडीत गोळी घुसून ते जखमी झाले होते. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते. मुख्य आरोपी हे कर्नाटकातील बंगळूर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उत्तम तारू, उज्ज्वल मोकाशी, अमोल सरडे आणि गजानन सोनुने यांच्या पथकाने तिघांना अटक केली.

आरोपींना पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT