Company Fraud sakal
पुणे

Company Fraud : कंपनीची ३२ लाखांची फसवणूक ; दुसऱ्या कंपन्यांना मालाची परस्पर विक्री

कंपनीतील उत्पादित माल परस्पर दुसऱ्या कंपन्यांना विकून सुमारे ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कंपनीतील उत्पादित माल परस्पर दुसऱ्या कंपन्यांना विकून सुमारे ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन प्रा.लि. कंपनीतील कमर्शिअल हेड अशोक विठोबा वर्पे (वय ४७, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माधव कल्याण जगताप, धनश्री माधव जगताप, प्रशांत जयराम जगताप (तिघे रा. पणदरे ता. बारामती), राहुल अनिल सुलाखे, पूजा जगताप, मीनाक्षी कदम आणि धर्मेंद्र सुतार अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या कंपनीत इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल आणि मायक्रोप्रोसेसर कंट्रोल पॅनल उत्पादित केले जाते.

कंपनीकडून एका कंपनीला सवलतीच्या दरात माल विक्री केला जातो. त्याचा गैरफायदा घेत कंपनीतील सेल्स एक्झिक्युटिव्ह माधव जगताप याने दुसऱ्या एका कंपनीला परस्पर सवलतीच्या दरात माल विक्री केला. त्याचे बिल कंपनीच्या दुसऱ्या बॅंक खात्यात जमा झाल्याने शंका आली. त्याची माहिती घेतली असता जगतापने यापूर्वी राहुल सुलाखे यास परस्पर माल विक्री केल्याचे निदर्शनास आले.

२०१८ ते २०२२ या कालावधीत जगताप, कंपनीतील यापूर्वीचे कर्मचारी राहुल सुलाखे, पूजा जगताप, मीनाक्षी कदम, धर्मेंद्र सुतार यांनी संगनमत करून मालाची परस्पर विक्री करून कंपनीची ३१ लाख ८४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता जगतापने संगनमताने स्वतःच्या, पत्नी धनश्री आणि मित्र प्रशांत जगताप यांच्या खात्यात जमा करून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT