पुणे

प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीसाठी ३२ पथके

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय चार याप्रमाणे ३२ पथके स्थापन केली आहेत. संबंधित बंदीला अनुसरून आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.  

प्रत्येक आरोग्य निरीक्षकाला क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध भाजी मंडईत पंधरा दिवसांतून एकदा, व्यापारी क्षेत्र, मटण/मच्छी विक्रेते येथे आठवड्यातून एकदा आणि रोज किमान १० दुकानांची तपासणी करून त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीबाबत जनजागृती केली जाणार आहे. नॉन-ओव्हन पिशव्यांवर संपूर्ण बंदी आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. 

फेरीवाले, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, स्वच्छ संस्था, व्यापारी, प्लॅस्टिक असोसिएशन आदी संघटनांची बैठक आयोजित केली आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल यांच्या पुनर्वापराच्या अनुषंगाने रस्त्याच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करण्याच्या नियोजनाबाबत स्थापत्य विभागास कळविले आहे. प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीला अनुसरून कचरा वेचकांसाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

राज्यभरात २३ मार्चपासून लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीची जिल्हास्तरावरील अंमलबजावणीची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात राज्यातील महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. महापालिका कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार, सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहायक आरोग्याधिकारी यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोल वस्तूंचा वापर, साठवणूक, हाताळणी याबाबत लागू केलेल्या बंदीची सक्त अंमलबजावणी करावी, असे गावडे यांनी नमूद केले.

पाच लाखांचा दंड वसूल
प्लॅस्टिकबंदीअंतर्गत आतापर्यंत ९९ नागरिक व दुकानदारांकडून चार लाख ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढील काळात प्लॅस्टिक व थर्माकोलबंदी अंमलबजावणीची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. नागरिक, व्यापारी, उत्पादक, व्यावसायिक, संघटना, संस्था यांनी प्लॅस्टिक व थर्माकोलबरोबरच नॉन-ओव्हन पिशव्यांचा वापर करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT