Illegal Digital Hoarding sakal
पुणे

Pune Crime : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस

दहीहंडीच्या काळात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पाण्याच्या बाटलिच्या जाहिरातीचे सुमारे अडीच हजार जाहिरात फलक लावणे पडले महागात.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - दहीहंडीच्या काळात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पाण्याच्या बाटलिच्या जाहिरातीचे सुमारे अडीच हजार जाहिरात फलक लावणे महागात पडले आहे. शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने उद्योगपती पुनीत बालन यांना ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र हे सण सार्वजनिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यासाठी मंडळांना कंपन्यांकडून जाहिराती दिल्या जातात. राज्य सरकारने गेल्यावर्षीपासून गणेशोत्सवाच्या काळातील मांडव शुल्क, परवाना शुल्क, जाहिरात शुल्क माफ केले आहे. पण दहीहंडी व नवरात्र उत्सवासाठी शुल्क भरावे लागते.

बालन यांच्याकडून ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये शहरातील पेठांमधील प्रमुख रस्ते, चौक, ऐतिहासिक ठिकाणे यासह इतर ठिकाणी दहीहंडीच्या निमित्ताने बालन यांच्यातर्फे जाहिरात फलक लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच समाज माध्यमावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

महापालिकेच्या परवाना निरीक्षकांनी शहरात फिरून पाहणी केली असता त्यामध्ये ४ बाय ८ आकाराचे अंदाजे २ हजार ५०० जाहिरात फलक अनधिकृतपणे लावून विद्रूपीकरण केल्याचे दिसून आले. महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक जाहिरात फलकाला प्रतिदिन ४० रुपये इतके शुल्क आहे. त्यानुसार ८० हजार चौरस फुटासाठी १० दिवसाप्रमाणे ३ कोटी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

दहीहंडीच्या काळात परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्याने महापालिकेने नोटीस बजावली असून, ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड केला आहे. नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसात ही रक्कम न भरल्यास मिळकतकरातून ही रक्कम वसूल केली जाईल.’

- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT