DSK Sakal
पुणे

Pune Crime : डीएसके यांच्या ३३५ स्थावर मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने केल्या जप्त

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या आत्तापर्यंत ३३५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या.

सनील गाडेकर

पुणे - ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या आत्तापर्यंत ३३५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच डीएसके यांच्या विविध कंपन्या व खासगी वापराची ४६ वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यातील १३ वाहनांचा लिलाव केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने मुंबर्इ उच्च न्यायालयात नुकत्याच दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत डीएसके यांची कोणतीही मालमत्ता जप्तीच्या कारवाईतून वगळण्यात येवू नये, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका ठेविदारांच्यावतीने ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमुर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. डीएसके यांच्या जप्त व लिलाव केलेल्या मालमत्तेची माहिती सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

दरम्यान पैसे परत मिळावे म्हणून ठेवीदारांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.

या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळाला असून ते कारागृहातून बाहेर आले आहेत. मात्र ठेवीदारांना अद्याप कोणताच दिलासा मिळालेली नाही. या सर्वांचा विचार करून न्यायालयाने ठेवीदारांच्या हिताचा विचार करावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती ॲड. बिडकर यांनी दिली.

२७६ बँक खाते गोठविले -

डीएसके, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावाने असलेले २७६ खाते गुन्हा दाखल झाल्यानंतर गोठविण्यात आले आहेत. या खात्यांमधील १२ कोटी नऊ लाख ७४ हजार ७१५ रुपये न्यायालयात जमा करण्यात आले आहेत. या रकमेतून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काही प्रमाणात परत मिळाव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी न्यायालयात केली आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

तीन मालमत्ता वगळल्या -

या गुन्ह्यात सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या तीन मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत. याबाबत विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोंढवा, फुरसुंगी आणि धायरी येथील स्थावर मालमत्ता जप्तीमधून वगळण्यात आल्या. डीएसके यांच्या आणखी १९ मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्या जप्त करण्याबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भाजपात जाणार? सुजय विखेंचे खळबळजणक विधान

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Samruddhi Expressway fire incident : समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली

Loni Kalbhor crime case: प्रेमसंबंधातून महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करून बदनामी; आरोपी हिंगोलीतून अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT