sahakarnagar
sahakarnagar 
पुणे

हरवलेले तब्बल 35 मोबाईल स्वारगेट पोलिसांनी परत केले 

सकाळवृत्तसेवा

‌सहकारनगर - शहरात शांतता व सुव्यवस्था राखत पोलिस नेहमी कामात व्यस्त असतात. हरवलेले मोबाईल परत मिळतीलच यावर नागरिकांना विश्वास नाही. मात्र स्वारगेट पोलिसांनी तब्बल 35 हरवलेले मोबाईल शोधून परत केले आहे. यामुळे नागरिकांचा पोलिसांच्या विषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र शेंगावकर, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंघ, सहाय्यक पोलिस आयुक्त राम मांडूरके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिसांनी हरवलेले मोबाईल नागरिकांना स्वारगेट पोलिस ठाण्यात बोलावून परत केले. स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.कदम,पोलिस सचिन दळवी, शैलेश साबळे यांनी आयएमईआय व सीडीआरच्या मदतीने जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत हरवलेले मोबाईल शोध घेऊन नागरिकांना परत केले.

विनोद नारायण मुसळे म्हणाले, बँकेची व इतर महत्वाची माहिती मोबाईल वर सेव्ह करून ठेवली होती. मोबाईल हरवल्याने मी हतबल झालो होतो परंतु स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी मोबाईल कसे शोधले जातात याची माहिती दिली. यामुळे मोबाईल परत मिळू शकतो याबद्दल विश्वास वाढला अखेर स्वारगेट पोलिसांनी हरवलेला मोबाईल मिळवून दिला.यामुळे पोलिसांच्या विषयीचा विश्वास वाढला.

डॉ. श्रेया वैदय (शनिपार पुणे) म्हणाल्या, माझा यापूर्वी मोबाईल हरवला होता. यामुळे हरवलेले मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा  नव्हती. मात्र स्वारगेट पोलिसांनी हरवलेला मोबाईल शोधून दिला. स्वारगेटला कार्यक्रम आयोजित करून मोबाईल विषयावर घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन केले. याबद्दल पोलिसांचे आभार.

अशोक कदम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वारगेट) म्हणाले, आयएमईआय व सीडीआरच्या मदतीने सहा महिन्यांपूर्वी हरवलेले मोबाईल शोध घेऊन नागरिकांना परत केले. नागरिकांनी मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे आहे. मोबाईल हरवल्यास ऑन लाईन तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT