teachers recruitment esakal
पुणे

Teachers Recruitment : पुणे महापालिका साडे तिनशे शिक्षकांच्या जागा भरणार

पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तेथील शाळांसह जुन्या हद्दीतील शाळांमध्ये शिक्षकांच्या ३५५ जागा रिक्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तेथील शाळांसह जुन्या हद्दीतील शाळांमध्ये शिक्षकांच्या ३५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठीची बिंदूनामावलीस (रोस्टर) अंतिम मान्यता मिळविण्यासाठी हा शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहेत. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक वर्षात शिक्षक भरती झालेली नसल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी पडत आहे. त्याचा परिमाण शिक्षकांच्या कार्यक्षमतेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. सध्या ६५० शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. पण शासनाने रजा मुदतीच्या काळातील ९३ शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे आंतर जिल्हा बदलीद्वारे शिक्षक पुणे महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सध्या ३५५ जागा रिक्त आहेत.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदूनामावली तयार करून ती शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. राज्य शासनाकडे उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदूनामावली मंजूर केली आहे. पण मराठी व इंग्रजी माध्यमांची बिंदूनामावली अद्याप मंजूर झालेली नाही. हा निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली जाईल.

समाविष्ट गावातील ६५ पैकी ६१ शाळांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. उर्वरित चार शाळांसाठी सध्या महापालिका व जिल्हा परिषदेचे अधिकारी संयुक्तपणे काम करत आहेत, असेही बिनवडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT