Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : ‘कंपन्या राज्याबाहेर जाण्यापासून थांबवा’

‘‘महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या ५८ हजार नोकऱ्या जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या ५८ हजार नोकऱ्या जाणार आहेत.

जर राज्य सरकारने दहा जूनपर्यंत या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रात राहण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही ,तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना शेख म्हणाले की, राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यास सध्याचे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अपयशी ठरले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवडमधील कंपन्या देखील आता राज्याबाहेर जात आहेत.

राज्यातील रोजगार इतर राज्यात जात असताना आता हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. हे गद्दार सरकार केवळ आमदार फोडण्यात मश्गूल आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रोजगार देखील राज्याबाहेर जात आहेत.

‘‘हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना, महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना सरकार बघायची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न येथील युवकांना पडलेला आहे, असे शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT