Beautiful Baramati City Sakal
पुणे

38 खासदार संसदीय सहायक बारामती दौ-यावर

विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहायक दोन दिवसांच्या बारामती दौ-यावर आले आहेत.

- मिलिंद संगई

विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहायक दोन दिवसांच्या बारामती दौ-यावर आले आहेत.

बारामती - विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहायक ( लँप- लेजिस्लेटीव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट) दोन दिवसांच्या बारामती दौ-यावर आले आहेत.

खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातून काही युवकांची नियुक्ती केली जाते. परिक्षा व मुलाखतींद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या 21 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांना थेट खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी मिळते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना थेटपणे मदत करतात. संसदेत उपस्थित करायचे प्रश्न, त्यांची भाषणे लिहून देणे, त्यांना इतर कामकाजात मदत करणे अशा स्वरुपाची कामे या युवकांकडून केली जातात.

असेच 38 खासदारांचे संसदीय सहायकांनी आज (ता. 7) कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इनक्युबेशन सेंटर, बारामती नगरपालिका यांची माहिती घेत पाहणी केली. उद्या (ता. 8) हे सहायक बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना ते भेट देणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या नोंदी या सहायकांनी घेतल्या आहेत.

38 खासदारांना अहवाल सादर करणार....

बारामती हे विकासाचे मॉडेल म्हणून पुढे आले आहे, प्रत्यक्षपणे विकास कसा झाला आहे, ते पाहण्याच्या उद्देशाने आम्ही बारामतीत आलो आहोत. या दौ-याचा अहवाल आम्ही ज्या 38 खासदारांसमवेत काम करत आहोत, त्यांना आम्ही सादर करणार आहोत. त्यांनाही त्यांच्या मतदारसंघात यातील काही गोष्टी या मुळे करता येतील.

- नीलेश साळुंके, खासदार संसदीय सहायक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT