coronavirus-test 
पुणे

खेडमध्ये आणखी ४ कोरोनाबाधित, वेल्ह्यातील सात जणांचे अहवाल... 

सकाळवृत्तसेवा

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चाकण येथे ६ जून रोजी आढळलेल्या रुग्णाच्या आईवडिलांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर निघोजे येथील एक आणि बहुळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेड तालुक्यात आज एकाच दिवशी चारजण कोरोनाबधित आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. 

चाकण येथील कोरोनाबधित अधूनमधून हडपसरला येजा करीत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील १४ जणांच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यातील ११ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला, मात्र त्याच्या आई आणि वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या पत्नीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. 

दरम्यान, तालुक्यातील निघोजे येथे एक तरुण पॉझिटिव्ह मिळाला आहे. तो स्वतःच पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल झाला होता. तो मूळचा लातूरचा असून, एका कंपनीतल्या केटरिंग ठेकेदारकडे काम करीत आहे. तसेच, बहुळ गावातील एकजणास लक्षणे आढळल्याने तेथील खासगी डॉक्टरांनी चाकणच्या क्रिटिकेअर रुग्णालयात पाठविले होते. तपासणीनंतर तो पॉझिटिव्ह आढळला. 

वेल्हे : वेल्हे तालुक्‍यातील साखर गावातील बाधित ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर निगडे मोसे परिसरातील बाधित महिलेच्या संपर्कातील अकरा जणांचे तपासणी अहवाल बाकी आहेत. तसेच, दामगुडा आसनी परिसरातील संशयित व्यक्ती, असे मिळून बारा जणांचे अहवाल बाकी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. साखर गाव व निगडे मोसे परिसरातील गावे सील केली असून, या ठिकाणी तपासणी नाके तयार केले आहेत. या गावांमधील लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT