Pune Band Sakal
पुणे

Pune Crime News : पुणे हादरलं! दोन मुलांसह पती-पत्नीची विष पिऊन आत्महत्या

या घटनेने पुणे परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात एकाच परिवारातल्या चौघांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंढवा परिसरात विषारी द्रव्य पिऊन या चौघांनी आत्महत्या केली आहे. यामागे काही आर्थिक समस्या हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्यातल्या मुंढवा परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. दिपक थोटे (59), इंदू दिपक थोटे (45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते मुंढवा भागातील केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.

आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

हे दांपत्य २ महिन्यापूर्वी केशवनगर भागात एका घरात भाड्याने राहत होते. काल रात्रीपासून थोटे घराचा दार उघडत नसल्याने शेजारी रहात असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा दरवाजा ठोठावला. थोटे दांपत्य दार उघडत नसल्याने शेजारी राहत असलेल्या काही नागरिकांनी त्यांचा दरवाजा उघडायचा प्रयत्न सुद्धा केला.

दरवाजा उघडला गेल्यानंतर त्यांना घरातील बेडरूम मध्ये ४ जणांचे मृतदेह आढळून आले. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांना पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, घरामध्ये इतरत्र काही संशयास्पद वस्तू सापडली नाही. घरात रात्रीचे जेवण दोन भाज्या व चपाती हे साहित्य मिळून आले असून ते ताब्यात घेतले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT