thief.jpg 
पुणे

पुण्यात चोरट्यांचा धुमाकुळ; चार घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

सकाळ संवाद

पुणे : औंध, कोंढवा येथे भरदिवसा तीन फ्लॅट फोडले तर, मुंढवा येथे रात्री फ्लॅमध्ये चोरी केली. या घटनांमध्ये चार लाखापेक्षा जास्त ऐवज चोरीला गेला आहे. अनुजा कुलकर्णी (वय 34, औंध) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांचा कस्तुरबा गांधी वसाहतीच्या पाठीमागे असलेल्या सोसायटीत फ्लॅट आहे. त्या कोथरूड येथील एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. मंगळवारी सकाळी आठ वाजता त्या नोकरीला गेल्या, सायंकाळी सहाला घरी आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या सोसायटीतील दिपाली सुनील कामळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक टी. एम. फड करत आहेत. 

प्रतिभा गिरीष किराड (वय 33 ) यांचा कोंढव्यातील टिळेकरनगर येथील कुंज सोसायटीत फ्लॅट आहे. त्या सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कामा निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील दोन तोळे सोने व ग्रॅम चांगीचे दागिने असा साठ हजार रूपयांचा ऐवज लंपसा केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा सोध सुरू आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत. 

मुंढवा येथे रेणुकामाता मंदिराजवळील अक्षय जीवन वागळे (वय 34) यांचा फ्लॅट 11 जुलै रोजी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी रात्री आठ ते सकाळी 10 या दरम्यान फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी घरातून 30 हजाराची रोकड, सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळे असा एकूण 68 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT