Kidnaping sakal
पुणे

'डे केअर सेंटर'ला चाललेल्या 4 वर्षांच्या मुलाचा बाणेरमधून अपहरण

पोलिसांकडून या तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाणेर येथील हाय स्ट्रीट परिसरातुन "डे केअर सेंटर'ला (Day Care Center)चाललेल्या 4 वर्षांच्या मुलाच्या(4 Year old) अपहरणाच्या (Kidnapping) प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून (Pune Police)कसून तपास सुरु आहे. पोलिसांकडून विविध शक्‍यता लक्षात घेऊन तपासावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडून या तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून मंगळवारी (ता.11) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय 4 वर्षे ) यास एक मुलगा "डे केअर'ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार बालेवाडी पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. याप्रकरणी मुलाच्या आई-वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मुलाच्या अपहरणाच्या घटनेनंतर प्रभारी अधिकारी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) गजानन टोम्पे, चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते. या घटनेस चार दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप मुलाचा तपास लागला नसल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.(Pune Kidnapping Case)

त्यातच मुलाचे कुटुंबीय, नातेवाईकांकडून याबाबतची बातमी व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारीत केला जाऊ लागला आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींचीही भर पडली असून त्यांच्याही सोशल मीडिया साईटस्‌वर हि बातमी प्रसारीत केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये चतुःशृंगी पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू आहे. पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपासावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. या तपासावर वरिष्ठ पोलिस अधिकारी बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण, वाहने तपासणे, संशयित ठिकाणांची पाहणी व तपासणी अशा विविध स्तरावर काम सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. परंतु, त्याविषयी पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.(Pune crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

SCROLL FOR NEXT