40 passengers of Bharat Gaurav Yatra train coming from Chennai to Pune get food poisoning  
पुणे

Pune News : धक्कादायक! चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या रेल्वेतील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा

विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रोहित कणसे

चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घली असून सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या विषबाधेच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चेन्नईहून पुण्याकडे येणारी ही रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला पोहचली. तेव्हा रेल्वेमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये खानपानाची सोय देण्यात आली आहे. अनेकदा सकाळी पॅक केलेल अन्न सायंकाळी, रात्री देण्यात येते त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT