40 percent Property tax exemption application available online pmc
40 percent Property tax exemption application available online pmc  sakal
पुणे

Property Tax : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने ज्या नागरिकांची ४० टक्के मिळवण्यासाठी पीटी ३ हा अर्ज भरून महापालिकेकडे जमा करावा लागणार असल्याने तो अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे मिळकत दिली जाणारी ४० टक्के सवलत काढून घेण्यात आलेली होती. २०१९ पासून त्याची वसुली केली जात होती. या विरोधात पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ही सवलत पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या आर्थिक वर्षापासून केली जात आहे.

पुणे महापालिकेच्या मिळकत विभागाने त्यानुसार बिले तयार करणे व ज्या नागरिकांनी ४० टक्के सवलतीची रक्कम भरलेली आहे त्यांना ती परत करणे व ती पुन्हा लागू करणे यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. सुमारे पावणेतीन लाख नागरिकांना ही सवलत पुन्हा मिळविण्यासाठी महापालिकेकडे पीटी ३ हा अर्ज सादर करावयाचा आहे.

पण हा अर्ज कुठे मिळतो, पुरावे काय जोडावे लागतात आणि अर्ज भरल्यानंतर तो कोठे सादर करावा याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले आहे.

मिळकत करून विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले, "पीटी ३' हा अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरावा, हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळकत निरीक्षकाकडे जमा करावा किंवा नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील जमा करता येईल.

स्थायी समितीच्या पूर्वीच्या निर्णयानुसार हा अर्ज सादर करताना यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष जाऊनच हे अर्ज सादर करावे लागणार आहेत

ही आहे लिंक

propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर निवासी मिळकतींसाठी 40% सवलतीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT