Pune Lok Sabha Esakal
पुणे

Pune Lok Sabha: पुण्यातील ४२ गुंड तडीपार; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई

Pune Lok Sabha: लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सात पोलिस ठाण्यांतील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हद्दपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर भागांत गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. शहरातील पोलिस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी केली आहे.

यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागांत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे परिमंडळ पाचमध्ये कारवार्इ करण्यात आली.

शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गॅगने दहशत माजविली होती. सुरुवातीला हडपसर भागात कोयत्याने वार केल्याचे अनेक प्रकार घडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्‍विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT