A 42 year old man died of a heart attack in Pune as the ambulance was not received on time
A 42 year old man died of a heart attack in Pune as the ambulance was not received on time 
पुणे

धक्कादायक! पुण्यात 42 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू; पुन्हा ‘गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळालेच नाही

योगिराज प्रभुणे

पुणे : अँब्युलन्स आली नाही...हॉस्पिटलने दाखल करून घेतले नाही...हार्ट अटॅक आलेल्या पेशंटवर ‘गोल्डन अवर'मध्ये उपचार झाले नाही... त्यामुळे अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज पुण्यात 42 वर्षांचा पेशंट मृत्यूशी एकाकी लढला...खासगी गाडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत हृदयाची धडधड थांबलेली... तो तरूण देह निष्प्राण झालेला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

भारत फोर्समध्ये नोकरीला असलेल्या उमेश चाकोरे यांना पहाटे पाच वाजता अचानक खूप त्रास होऊ लागला. काय झालं काहीच कळायला तयार नाही. जहाँगिर हॉस्पिटलला फोन केला, पण त्यांनी पेशंटला दाखल करू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने 108 आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधला. मात्र, खडकमाळ आळीत पत्रे ठोकल्याचे कारण पुढे करत त्यांनी येण्यास नकार दिला. एक-एक मिनीट घडळ्याचा काटा पुढे सरकत होता. पण, पुण्यासारख्या ‘मेडिकल हब’ असणाऱया शहरात पेशंटच्या मदतीने अँब्युलन्स येत नव्हती, की हॉस्पिटल. अखेर काही मिनीटातच खासगी गाडीतून पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वच पेशंटाचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. पेशंटला सीवियर हार्ट अटॅक आला होता. त्यांना 'गोल्डन अवर'मध्ये योग्य उपचार मिळाल नाही. त्यामुळे पेशंटचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

या बाबत अधिक माहिती देताना पेशंटचे नातेवाईक निलीमा भिलारे म्हणाल्या, “स्थानिक डॉक्टरांना दाखवा मगच आम्ही पेशंटला दाखल करू असे, उत्तर जहांगिर हॉस्पिटलमधून मिळाले. दोन ते तीन ठिकाणी अँब्युलन्स मिळण्यासाठी फोन केले. त्यात 108ला देखिल फोन केला. पण, कोणतीच अँब्युलन्स मिळाली नाही. कोणीच काही प्रतिसाद दिला नाही. अँब्युलन्स वेळेत आली असती तर, त्यांचे प्राण वाचले असते. त्यांना दोन छोटी मुले आहेत. मुलगा जेमतेम दोन वर्षांचा तर, मुलगी जवळपास सहा वर्षांची आहे.”

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील प्रगत समजल्या जाणाऱया महाराष्ट्रात, त्यातही पुण्यात पेशंटला वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यामुळे त्याचे अक्षरशः प्राण जातात. ही अत्यंत वाईट घटना आहे. आमच्या आयुष्यात हा दिवस कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. 

अँब्युलन्स न आल्याने पेशंटला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले नाही. त्यामुळे नाना पेठेत पेशंटचा रस्त्यावर खूर्चीत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याच कारणाने पुण्यात आणखी एक तरुण मृत्युमूखी पडला. यावर कोरोनाचा उद्रेक सुरू असताना पेशंटला वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही. अँब्युलन्स येत नाही. हॉस्पिटल दाखल करून घेत नाही. यात पेशंटचा मृत्यू होतो. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी साथरोग नियंत्रण कायद्याच्या पार्श्वभूमीवर झाली पाहिजे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By : Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT