corona.jpeg 
पुणे

हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेलीकरांनो आत्तातरी जागे व्हा... कारण हवेलीमधील रुग्णांची संख्या विविध उपाय योजना करुनही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल ४२० वर पोचला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील आठ विविध ग्रामपंचायत हद्दीत ४३ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, हवेली तालुक्यात शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोनाबाधित  रुग्णांचा आकडा तब्बल ४२० वर पोचला असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. शनिवारी दिवसभरात उरुळी कांचन (४), डोणजे (१), मांगडेवाडी (११), देहू (९), लोणी काळभोर (४), किरकटवाडी (१), खडकवासला (४) व नऱ्हे (९) या आठ ग्रामपंचायत हद्दीत ४३ रुग्ण आढळून आल्याची माहितीही डॉ. खरात यांनी यावेळी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. खरात म्हणाले, हवेली तालुक्यात मागिल तीन दिवसाच्या तुलनेत शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या थोडीफार तरी कमी झाली आहे. मागिल तीन दिवसात हवेलीत बुधवारी ६३ तर गुरुवारी व शुक्रवारी या दोन्ही दिवशी ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मागिल तीन दिवसाच्या तुलनेत शनिवारी आलेली आकडेवारी थोडाफार तरी दिलासा देणारी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलिस दलासह ग्रामपंचायत प्रशासन आपआपल्या पध्दतीने लढाई लढत आहे. नागरिकांनीही कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरुन, सोशल डिस्टन्सिंग पालन करुन प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. असेही मत डॉ. खरात यांनी यावेळी व्यक्त केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरुळी कांचन व परिसरात अडीचशे बेड उपलब्ध होणार

अधिक माहिती देताना डॉ. खरात म्हणाले, पूर्व हवेलीत मागिल दहा दिवसापासून उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांना लोणी काळभोर पासून पुणे शहरातील विविध रुग्णालयांचे दरवाजे ठोठवावे लागत होते. यातून मार्ग काढण्यासाठी पूर्व हवेलीमधील विश्वराज हॉस्पिटल (लोणी काळभोर), प्रयागधाम हॉस्पिटल (प्रयागधाम), चिंतामणी हॉस्पिटल (कोरेगाव मूळ) या तीन खासगी रुग्णालयामधील अडीचशे बेड हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन दिवसापूर्वी आरोग्य विभागाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार पुढील दोन दिवसात वरील तीन खासगी रुग्णालयातील बेड उपलब्ध होणार आहेत.


रुगणांच्या विलगीकरणासाठी निसर्गोपचार आश्रमाची चाचपणी...

रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना यापुढील काळात बेड कमी पडणार आहेत. यातुन मार्ग काढण्यासाठी उरुळी कांचन व परिसरातील रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क नातेवाईकांच्या विलगीकरणासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील येथील महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमाची चाचपणी महसुल व आरोग्य विभागाने सुरु केली आहे. आरोग्य विभागाच्या ताब्यात निसर्गोपचार आश्रम मिळाल्यास, उरुळी कांचन व परिसरातील दोनशेहून अधिक रुग्णांची सोय होऊ शकते. पुढील दोन दिवसात महसुल व आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी आश्रमाची पहाणी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT