पुणे

मांदळेवाडीतील शर्यतीत धावले ४२६ बैलगाडे

CD

पारगाव, ता. १६ : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री हनुमान यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. १४) व बुधवारी (ता. १५) या दोन दिवस बैलगाडा शर्यती झाल्या. त्यात एकूण ४२६ बैलगाडे पळाले. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण रोख साडेचार लाख रुपये रोख, तसेच एक मोटारसायकल, दोन फ्रिज, दोन एलसीडी टीव्ही, दोन सायकली, दोन कुलर व चषक बक्षीस देण्यात आले.
मांदळवाडीत यावर्षीपासून जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. मुख्य आकर्षण मोटारसायकलचे बक्षीस कृष्णा विजय मेरगळ (जांबूत) यांनी जिंकले, तर पहिला दिवस घाटाचा राजा दुर्योधन दगडू शिंगाडे (शिंगाडवाडी) यांचा बैलगाडा ठरला.
पहिल्या दिवशी २११ बैलगाडे धावले, तर दुसऱ्या दिवशी २१५ बैलगाडे धावले. प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये बक्षीस होते. प्रथम क्रमांकात एकूण २३ बैलगाडे आले. त्यामध्ये पहिला दिवस प्रथम क्रमांक फळीफोड अनुज विशाल उमाप (जातेगाव) यांचा गाडा, तर दुसरा दिवस प्रथम क्रमांक फळीफोड बजरंग बैलगाडा संघटना डोके व गुळवे जुगलबंदी यांचा ठरला. त्यांना फ्रिज बक्षीस देऊन सन्मानित केले.
द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये बक्षीस होते. द्वितीय क्रमांकात एकूण १०५ बैलगाडे आले. त्यामध्ये पहिला दिवस द्वितीय क्रमांक फळीफोड गोरक्ष शहाजी साबळे व हरगुडे जुगलबंदी यांचा गाडा, तर दुसरा दिवस द्वितीय क्रमांक फळीफोड गणेश जाधव व गणेश काटकर जुगलबंदी यांचा ठरला. त्यांना एलसीडी टीव्ही बक्षीस दिले.
तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये बक्षीस होते. तृतीय क्रमांकात एकूण ११३ बैलगाडे आले. त्यामध्ये पहिला दिवस तृतीय क्रमांक फळीफोड निवृत्ती किसन गावडे यांचा गाडा, तर दुसरा दिवस तृतीय क्रमांक फळीफोड देवेंद्र विठ्ठल सरडे यांचा गाडा ठरला. दोघांनाही सायकल बक्षीस दिले.
चतुर्थ क्रमांकासाठी ३१ हजार रुपये बक्षीस होते. चतुर्थ क्रमांकात एकूण ४९ बैलगाडे आले. त्यामध्ये पहिला दिवस चतुर्थ क्रमांक फळीफोड संतोष सुभाष आदक व लांडगे जुगलबंदी यांचा गाडा, तर दुसरा दिवस चतुर्थ क्रमांक फळीफोड देविदास अरुण मेहेर यांचा गाडा ठरला. त्यांना कुलर बक्षीस दिले.
फायनलसाठी प्रथम क्रमांकात अनुक्रमे पोपट गोविंद आदक, केतन शहा व सचिन सोनावणे जुगलबंदी, कृष्णा विजय मेरगळ व बजरंगबली बैलगाडा संघटना यांचे गाडे आले, तर द्वितीय क्रमांक फायनलसाठी अनुक्रमे ज्ञानोबा लक्ष्मण चौधरी, अमोल शिवाजी चौधरी व साहेबराव सीताराम नाणेकर यांचा गाडा आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT