Veer Dam Water Discharge
Veer Dam Water Discharge Sakal
पुणे

वीर धरणातून ४३ हजार क्युसेकने विसर्ग; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

शुक्रवारी (दि. १६) दिवसभर वीर धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून नीरा नदी पात्रात ३२४५९ इतका विसर्ग सुरू होता.

परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणाचे नऊ दरवाजे चार फुटांनी उचलून नीरा नदी पात्रात ४१७३३ क्युसेक तसेच उजव्या कालव्यातून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ११०० क्युसेक व डाव्या कालव्यातून ९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पात्रात एकूण ४३ हजार ७३३ क्युसेक पाणी सोडण्यात आले असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले आहे. नीरा नदी दुथडी भरून वाहत असून नीरा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहील्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले आहे. वीर धरणाच्या खाली सासवड, लोणंद रस्त्यावर असलेला पुल पाण्याखाली गेला असून या मार्गाने सातारा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतरतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि. १६) दिवसभर वीर धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून नीरा नदी पात्रात ३२४५९ इतका विसर्ग सुरू होता. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संध्याकाळी पाच वाजता धरणाचे नऊ वर्क दरवाजे चार फुटांनी उचलून वीर धरणातून ४१ हजार ७३३ क्युसेक इतका मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. निरा खोऱ्यातील धरणे तुडुंब भरली आहेत.

भाटघर धरणातून वीर धरणात ११ हजार ८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नीरा देवघर धरणातून ५ हजार ६० विसर्ग सुरू आहे.गुजवणी धरणातून १ हजार ७८० येवढा विसर्ग सुरू आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणा व्यतिरिक्त २४ हजार क्युसेक पाण्याची आवक वीर धरणात होत आहे.

वीर धरण प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना म्हणून खंडाळा व पुरंदर तालुका तहसीलदार तसेच लोणंद, खंडाळा, सासवड पोलिसांना या बाबत सुचना देण्यात आल्या असून पूर नियंत्रण कक्षाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले आहे. नीरा नदी पाणलोट क्षेत्रात तसेच घाट माथ्यावर पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT