Recruitment esakal
पुणे

Namo Rojgar Melava : बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43613 जागांवर पदभरती होणार

बारामती येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल 311 उद्योजक सहभागी होणार असून 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे.

मिलिंद संगई

बारामती - येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल 311 उद्योजक सहभागी होणार असून 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

बारामतीत नमोरोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. येत्या 2 व 3 मार्च रोजी होणा-या या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली परिसरातून युवक येणार आहेत. दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान, भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार असल्याचेही वैभव नावडकर यांनी सांगितले.

दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये, या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वैभव नावडकर, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी 14000 हून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी न करणा-या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

विविध विभागांमधील पदवीधर विद्यार्थी या मेळाव्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या मेळाव्या दरम्यान करियर मार्गदर्शनाचे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत.

वरिष्ठ अधिकारी बुधवारी येणार...

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 28) बारामतीस भेट देणार आहेत, असे वैभव नावडकर यांनी सांगितले.

येथे संपर्क साधावा...

या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: तिढा सुटला! विजय थलापती उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; कसा असेल फॉर्म्युला?

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुवाहाटी येथे दाखल

MHADA: म्हाडाच्या १५६ लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपणार, २५ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती होणार; घरांच्या किमतीतही १५ लाखांनी घट

RR vs GT Live : 4,wd,0,2nb,5wd,wd,wd,0,1,2,1! जोफ्रा आर्चरने षटक पूर्ण करण्यासाठी टाकले ११ चेंडू; शेवटच्या चेंडूवर वादग्रस्त घटना...

Sachin Tendulkar: ''हेल्मेट कुठंय?'' पुण्यात अचानक सचिन तेंडुलकरची गाडी थांबली, तरुणाची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT