Rare Plants Sakal
पुणे

Rare Plants Found : पुरंदरमध्ये आढळल्या ४४ अतिदुर्मीळ वनस्पती

जैवविविधतेने नटलेला पुरंदर तालुका हा परंपरागत वनऔषधींसाठीही प्रसिद्ध आहे.

सम्राट कदम

पुणे - जैवविविधतेने नटलेला पुरंदर तालुका हा परंपरागत वनऔषधींसाठीही प्रसिद्ध आहे. तालुक्यात आढळणाऱ्या १३५० सपुष्प वनस्पतींचे सर्वेक्षण झाले असून, त्यामध्ये ४४ अतिदुर्मीळ प्रकारच्या वनस्पतींचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यात तीन सपुष्प वनस्पती या जवळपास नष्ट होण्याचा मार्गावर आहेत.

पुण्यातील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कैलास बगडाणे आणि सांगवी येथील बाबूराव घोलप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ज्ञानेश महाजन यांनी यासंबंधीचे संशोधन केले. डॉ. बगडाणे यांच्या पीएच.डी. प्रबंधाशी निगडित या संशोधनाला जून २०१४ मध्ये सुरुवात झाली.

डॉ. बगडाणे सांगतात, ‘पुरंदर तालुक्यातील धनगर समाजाकडून परंपरागत पद्धतीने वनौषधी दिली जायची. या तालुक्यात पुर्वीपासूनच वनसंपदा भरपूर होती. त्यामुळे संशोधनासाठी या तालुक्याची आम्ही निवड केली. सुमारे सहा वर्ष आम्ही या परिसरात सर्वेक्षण करत सपुष्प वनस्पतींची नोंद केली. सन १९५८ मध्ये परदेशी नागरिक सांतापु यांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण पुरंदर किल्याभोवती केले होते. ज्यामध्ये फक्त ६८३ वनस्पतींची नोंद झाली. त्यानंतर झालेला हे सर्वात व्यापक सर्वेक्षण असून, त्यात अतिदुर्मीळ वनस्पतींचीही नोंद झाली आहे.’’

नष्ट होण्याच्या मार्गावरील वनस्पती

१) शिंदळ-माकुडी, २) कंदीलपुष्प,

३) लाविखारपुडी किंवा तिलोरी

अतिधोक्यात असलेल्या वनस्पती

१) खारपुडी

२) फटपटी

३) निलांबरी

४) ऑर्चिड

५) अमृत किंवा घणेरा

६) श्वेतांबर

सर्वेक्षणाचे निष्कर्ष

  • अतिदुर्मीळ ४४ वनस्पतींसह १३५० सपुष्प वनस्पतींची नोंद

  • आजही पुरंदर तालुक्यात सपुष्प वनस्पतींची समृद्ध संपदा

  • वाढते शहरीकरण आणि स्थानिकांना कल्पना नसल्याने दुर्मीळ वनस्पतींना धोका

  • पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, देवरायांमुळे वनस्पतींना संरक्षण मिळाले

  • पावसाळ्यात बरड माळरानावरही या वनस्पती फुलतात

संशोधकांच्या सूचना

  • अतिदुर्मीळ वनस्पतींसंदर्भात विद्यार्थी, स्थानिक आणि सैन्य आस्थापनांमध्ये जागृतीची गरज

  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अशा वनस्पती आहेत, त्यांना संवर्धनासाठी आर्थिक मदत करावी

  • मोठी बांधकामे, रस्ते आदी विकास कामांवेळी अतिदुर्मीळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी उपाययोजना आवश्यक

  • जवळपास नष्ट झालेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी तातडीने लक्ष द्यायला हवे

पुरंदरमधील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रे

बादलवाडी, चिव्हेवाडी, देवणेवाडी, घेरापुरंदर, केतकावळे, कुंभोषी, पानवडी, पिंगोरी आणि सताळवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT