fraud pune sakal
पुणे

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बालेवाडी येथील एका आयटी कंपनीतील अभियंता तरुणीच्या नावावर तिच्याच कंपनीतील एका सहकाऱ्याने परस्पर ४५ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालेवाडी येथील एका आयटी कंपनीतील अभियंता तरुणीच्या नावावर तिच्याच कंपनीतील एका सहकाऱ्याने परस्पर ४५ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अभियंता तरुणासह बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभियंता तरुणीने (वय ३२, रा. संजय पार्क, विमानतळ रस्ता) फिर्याद दिली आहे. त्यावरून धुव्रकुमार विष्णू शर्मा या संशयितासह बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाच एप्रिल २०१९ ते पाच मे २०२४ या कालावधीत घडला. या घटनेनंतर आरोपी शर्मा पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही तरुणी बालेवाडी येथील व्हेरिटास सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिस इंडिया प्रा. लि. कंपनीत आयटी अभियंता आहे. तर, आरोपी ध्रुवकुमार शर्मा याच कंपनीत पाच वर्षांपासून नोकरीस होता. शर्माने तरुणीला आर्थिक अडचण असल्याचे सांगून विश्वासात घेतले. तिच्याकडून पे स्लीप (वेतन चिठ्ठी), बॅंक स्टेटमेंट, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इ-मेलचा पासवर्ड घेतला. त्याने पे स्लीपमध्ये वेतन वाढवून दाखवले.

या कागदपत्रांच्या आधारे आणि बनावट सह्या करून एका बॅंकेसह दोन खासगी वित्तीय संस्थांमधून ४५ लाख चार हजार रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर त्याने काही महिने कर्जाचे हप्तेही भरले. हप्ते थकीत राहिल्यानंतर हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस. आर. चौधरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT