पुणे

सक्रिय कोरोना रुग्ण पाच हजारांच्या आत; शहरातील १६२६ जणांचा समावेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी (ता.३) पाच हजारांच्या आत आली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ हजार ९५१  सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार  ६२६ जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण रुग्णांपैकी ८८५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित ७४५ जणांना आपापल्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात पुणे जिल्ह्यात ४७५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १९८ जण आहेत. याउलट ४८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत तीन लाख ७२ हजार ५५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात शहरातील सर्वाधिक १९८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १६७, नगरपालिका क्षेत्रात ३१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज दिवसभरातील ९  जणांचा समावेश आहे. याशिवाय ४३७ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील एका रुग्णांसह पिंपरी चिंचवडमधील पाच आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT