Raj Thackeray Sakal
पुणे

Raj Thackeray : राज ठाकरे यांची शुक्रवारी सारसबाग येथे जाहीर सभा

चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या शुक्रवारी (ता.१०) शहरात सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या शुक्रवारी (ता.१०) शहरात सभा होणार आहे. ही सभा सारसबाग येथे सायंकाळी सहा वाजता होईल, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषेदत मंगळवारी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नांदगावकर म्हणाले, ‘‘ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तयारी सध्या सुरू आहे. महायुतीच्या वतीने सभा घेणे आवश्यक वाटत होते, त्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.

कणकवलीमध्ये नुकतीच सभा झाली असून आगामी काळात पुण्यासह कल्याण, ठाणे, डोंबिवली (ता.१२) येथे सभा होणार आहेत. तर महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ मे रोजी शिवाजी पार्क येथे सभा होणार असून या सभेत ठाकरे यांचेही भाषण होणार आहे.’’

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. म्हणूनच त्यांनी पुण्यात सभा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, सभेसाठी विविध ठिकाणांची पाहणी करून शहराच्या मध्यवर्ती भागात सभा घ्यायची म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मागणीनुसार सारसबाग हे ठिकाण निश्चित करण्यात आले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT