Liquor 
पुणे

पाच महिन्यांत रिचवली पाच कोटी लिटर दारू

अनिल सावळे

पुणे - शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल चार कोटी ७२ लाख लिटर देशी-विदेशी दारूची विक्री झाली आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत आणि खपामध्ये वेगाने वाढ होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 

‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए’, असं म्हटलं जातं. कधी दु:खात, आनंदात पार्टी म्हणून, कधी काही कारण नसताना, तर व्यसन जडल्यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण हे वाढतच आहे. राज्यात महिलांकडून दारूबंदीची मागणी केली जाते; परंतु दारू विक्रीतून जास्त महसूल मिळत असल्यामुळे त्या मागणीकडे फारशा गांभिर्याने पाहिले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतवर्षी महामार्गालगत पाचशे मीटर अंतरापर्यंतचे परमीट रूम आणि बिअर बार बंद झाले होते; परंतु सुधारित निर्णयानंतर ते पुन्हा सुरू झाले. जिल्ह्यात गेल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत देशी, विदेशी दारू आणि बिअर अशी एकूण चार कोटी ७२ लाख लिटर दारू मद्यप्रेमींनी रिचवली. या तुलनेत वाईन पिणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे; तरी जिल्ह्यात दर महिन्याला एक ते सव्वालाख लिटर वाईनची विक्री होते.

जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांवरील कारवायांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दरवर्षी मद्य पिणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे मद्य विक्रीत वाढ झाली आहे. यामुळे महसुलातही वाढ झाली आहे.
- डॉ. बी. एच. तडवी, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे जिल्हा   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT