water supply esakal
पुणे

Pune Water Supply : कात्रज-कोंढवा परिसरात पाणी बंदचा पाचव्या दिवशीही फटका

अधिकाऱ्यांकडून नागरिकांना प्रतिसादही नाही; नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

अशोक गव्हाणे

कात्रज - महापालिकेतर्फे गुरुवारच्या पाणी बंदचा फटका प्रत्येकवेळी पुढील दोन ते तीन नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र, यावेळी तो थेट पाच दिवसांवर गेला आहे. पाचव्यादिवशीही पाणीपुरवठा सुरळित झाला नाही. नागरिकांनी संपर्क केल्यास अधिकाऱ्यांकडून प्रतिसादही दिला जात नाही. एखाद्या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला तरी ते दुसऱ्याचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याचे समोर आले आहे.

वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे महादेवनगर आणि केदारेश्वर या दोन्ही टाक्यांना पाणीपुरवठा झाला नसल्याचे कात्रज आणि कोंढवा परिसरात गुरुवारपासून बंद असलेल्या पाणीपुरवठा हा सोमवारीही सुरळित न झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक ३८मध्ये काही प्रमाणात पाचव्या दिवशी पाणीपुरवठा सुरळित झाला. मात्र, प्रभाग क्रमांक ४१मधील हेमी पार्क, पवन पार्क, यशोधन सोसायटी, आयडियल पार्क आदी सोसायट्यांची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या दिवशीही पाणी न आल्याने पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ सोसायटीच्या सदस्यांवर आल्याचे हॅमी पार्क सोसायटीचे व्यवस्थापक समर सय्यद यांनी सांगितले. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रभाग क्रमांक ४१चे शाखा अभियंता विज्ञान गायकवाड यांना सातत्याने संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा विभागांकडून घेण्यात येणारा क्लोजर हा दुरुस्तीसाठी असतो की, सुरळित असलेला पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी हेच कळत नाही. अशा प्रकारे क्लोजर घेऊन प्रशासन नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्रास देते. - विनायक रायकर, स्थानिक नागरिक

वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळित करण्यास चालू आहे. कात्रज कोंढवा परिसरात नेमकी कुठे आणि काय अडचण आहे, हे जाणून घेऊन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळित करण्यात येईल. - काशिनाथ गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, स्वारगेट विभाग पाणीपुरवठा

पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. सर्वजण एकमेकांची नावे सांगण्यात तत्पर आहेत. अखेर, शाखा अभियंता विज्ञान गायकवाड यांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मेसेजही केले. मात्र, दिवसभर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणी कधी येणार हे माहिती नाही. आज पाचव्या दिवशीही पाणी आलेले नाही.

- विनय हुबळीकर, सदस्य, यशोधन सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT