Lalit Patil case 
पुणे

Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात बडतर्फ 5 पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने नियुक्ती केल्याने खळबळ

Drug smuggler Lalit Patil case: संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे अपील केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

Pune News: ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे अपील केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघा जणांना पुन्हा पोलीस दलात नियुक्ती मिळाली आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल मधून ड्रगची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.

आता या बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा गृह विभागाने पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रगची तस्करी करत होता. या प्रकरणात ललित पाटील याच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तस्करीत सहभाग आढळल्या प्रकरणात त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. आता यांना पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करून घेतल्याने खळबळ उडाली आहे

पुण्यात ललित पाटील प्रकरण चांगलंच गाजलं होतं. ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. यात पोलिसांचा देखील हात असल्याचं समोर आलं होतं. शिवाय, ससूनमधील प्रशासनाला हाताशी धरून ललित पाटील हे रॅकेट चालवत होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. सध्या, बडतर्फ पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT