चोरट्यानी हिसकावून नेली sakal
पुणे

पादचाऱ्याकडील 50 हजारांची रोकड;चोरट्यानी हिसकावून नेली

विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 6 तासातच ठोकल्या चोरट्यांना बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरदुपारी रहदारीच्या ठिकाणी रस्त्याने पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरीकाच्या हातातील 50 हजार रूपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेली.भरदुपारी घडलेल्या या घटनेची विश्रामबाग पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तांत्रिक विश्लेषण करुन अवघ्या 6 तासात चोरट्यांना अटक केली. हि घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता कुमठेकर रस्त्यावरील चितळे बंधू मिठाई दुकानाजवळ घडली.अली अजगर इक्बाल नजे (वय ३८, रा. रोहिदास वाडा, आझाद फरिद चाळ, ठाणे) , यासीन इमाम शेख (वय २४, रा. हाजी मलंग वाडी, अंबरनाथ,ठाणे), राजेश राधेश्याम सिंग (वय ३५, रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई), रवींद्र वसंत पांचाळ (वय ५०, रा. काळा तलाव, कल्याण, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश उपळकर (वय ५९) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उपळकर हे सेवानिवॄत्त आहेत. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता त्यांनी बैंकेतुन 50 हजार रुपये काढले. त्यानंतर पैसे पिशवीत ठेवून ते कुमठेकर रस्त्याने त्यांच्या घरी निघाले होते. ते चितळे बंधू मिठाईवाले दुकानाजवळ आले, तेव्हा काही जणानी त्यांच्यासमवेत चालण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एकाने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु , त्यांच्या नकळत हातातील पिशवीतील रक्कम काढली, त्यानंतर ते पसार झाले. आपल्या हातातील पैसे चोरुन नेल्याचे लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठुन फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून तांत्रिक विश्लेषण करुन सायंकाळी 6 वाजेपर्यंत 4 आरोपीना अटक केले. आरोपीनी याच पद्धतीने यापूर्वीही एक गुन्हा केला आहे. संबंधित टोळी नियोजनबद्धपद्धतीने असे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे अन्य साथीदाराचा शोध पोलिसांकडुन सुरु आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT