5000 kg stock of adulterated paneer brought from Karnataka seized police pune Sakal
पुणे

Pune Crime : कर्नाटकातून आणलेला पाच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त

कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे पाच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे पाच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कात्रज परिसरात ही संयुक्त कारवाई केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्या पथकाने कात्रज परिसरातून पाच जुलै रोजी टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोत ४ हजार ९७० किलो पनीरचा साठा आढळून आला. त्याचे नमुने बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अॅन्ड फूड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. मानवी शरीरास घातक असलेल्या १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलिस अंमलदार सुमीत ताकपेरे, महेश पाटील यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT