Tobacco
Tobacco 
पुणे

कोंढाव्यातून 53 लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशी-विदेशी कंपन्यांच्या सिगारेट्स, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक (पूर्व) ने पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल 53 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हरीश पोकाराम चौधरी (वय २६, रा. कोंढवा खुर्द) असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम कलम 11 तसेच कोटपा ॲक्ट कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात महावीर रेसीडेन्सी मधील एका सदनिकेमध्ये एक व्यक्ती विविध देशी विदेशी कंपन्यांच्या सिगारेट्सची तसेच प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला.

यावेळी चौधरी हा त्याच्या रहात्या घरामध्ये विविध देशी विदेशी कंपनीच्या सिगारेट्स तसेच प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून रूपये 53 लाख 56 हजार 650 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT