mephedrone seized
mephedrone seized sakal
पुणे

Drugs Seized : विश्रांतवाडी आणि दौंडमधून १२०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त; आत्तापर्यंत ६०० किलो अमली पदार्थ जप्त

सावता नवले

पुणे / कुरकुंभ - विश्रांतवाडीतील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत सुमारे ६०० किलो मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची बाजारपेठेतील किंमत सुमारे एक हजार २०० कोटी रुपये आहे.

पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रोनच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात सोमवारी (ता. २०) रात्री उशिरापर्यंत कारवार्इ सुरू होती. तर कुरकुंभ येथील अर्थकेम लॅब्रोटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवारी (ता. २०) पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकण्यात आला.

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना सोमवारी (ता.१९) गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेखने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन लपविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. विश्रांतवाडीतील गोदामातून ५२ किलो ५२० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

त्याची किंमत १०५ कोटी चार लाख रुपये आहे. तर अमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर याचे धागेदोरे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीपर्यंत पोचले. पुणे अन्वेषण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅब्रोटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवारी (ता. २०) पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकला. ही कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत चालू होती.

छाप्यात सहभागी असलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अंदाजे ५५० किलो मेफेड्रोनचा साठा सापडला. एकूण सुमारे ६०० किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक हजार २०० कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छापा टाकण्यासाठी आठ ते नऊ वाहनांमधून पोलिस पथक आले होते. यासंदर्भात स्थानिक पोलिसांना थोडीही कल्पना नव्हती. हे सकाळी त्यांच्या उशिरा येण्यावरून निदर्शनास आले. घटनास्थळावरून गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा व कंपनीच्या संबंधित अनिल साबळे व आणखी एकाला चौकशीसाठी घेऊन गेले.

तसेच, काही महत्त्वाची कागदपत्रे व संगणक जप्त केले आहेत. हे सर्व मुद्देमाल एका मालवाहू जीपमधून घेऊन गेले. कारवाई प्रक्रिया पूर्ण होऊनही अजून कारवाई चालू असल्याचे कारण सांगून पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले.

सुरक्षेचा प्रश्न गंभीर -

औद्योगिक वसाहतीत यापूर्वी समर्थ व सुजलम या दोन कंपन्यांमधून मेफेड्रोनचा साठा जप्त करत आरोपींना अटक करण्यात आली होती. आता अर्थकेम कंपनीवर केलेली कारवाई मोठी असून इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पहिल्यांदाच सापडले आहे. त्यामुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोणत्या कंपनीमध्ये कोणते उत्पादन घेतले जाते.

त्यासाठी कोणत्या केमिकलचा कच्चा माल वापरला जातो, याची माहिती लावण्याची मागणी वारंवार ग्रामस्थांकडून होऊनही याकडे कंपन्यांकडून दुर्लक्ष करून माहिती लपविली जाते. त्यामुळे स्फोट, आग व अमली पदार्थ बनविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आरोपींनी २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी -

पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना मंगळवारी (ता.२०) न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? यात परदेशी व्यक्तीचा हात आहे का? आरोपींचा या गुन्‍ह्यात कशा प्रकारे समावेश आहे? यासह गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याच्या सखोल चौकशीसाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT