nagpur  sakal
पुणे

Pune News : 'कुठलाही ईनाम नाही फक्त देवासाठी...' थापलिंगच्या घाटात धावणार ५५१ बैलगाडे

नागापूर येथे पौष पौर्णिमा निमित्ताने गुरुवार (ता.२५ ) व शुक्रवार (ता.२६) रोजी श्रीक्षेत्र थापलींग खंडोबा देवाची यात्रा संपन्न होत आहे, त्यानिमित्ताने पहाटे देवाची पूजा, अभिषेक त्यानंतर काठीची मिरवणूक आणि नंतर घाटात पहिल्या दिवशी २८१ तर दुसऱ्या दिवशी २७० असे एकूण नवसाचे ५५१ बैलगाडे पळणार आहेत.

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : ना सेकंद ना निशाण फक्त धावणार नवसाचे बैलगाडे,कुठलाही ईनाम नाही फक्त देवाच्या श्रद्धेपोटी बैलगाडा मालक घाटात बैलगाडे पळवण्याची परंपरा खूप जूनी आहे,नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलींग खंडोबा देवस्थान यात्रेत दोन दिवसात ५५१ नवसाचे बैलगाडे पळणार आहेत.

नागापूर येथे पौष पौर्णिमा निमित्ताने गुरुवार (ता.२५ ) व शुक्रवार (ता.२६) रोजी श्रीक्षेत्र थापलींग खंडोबा देवाची यात्रा संपन्न होत आहे, त्यानिमित्ताने पहाटे देवाची पूजा, अभिषेक त्यानंतर काठीची मिरवणूक आणि नंतर घाटात पहिल्या दिवशी २८१ तर दुसऱ्या दिवशी २७० असे एकूण नवसाचे ५५१ बैलगाडे पळणार आहेत.

दोन दिवस होणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून नवसाचे बैलगाडे पळविण्यासाठी सुसज्ज घाट सज्ज झाला आहे. यात्रेकरू साठी जादा एस टी बस ची व्यवस्था करण्यात आली असून पारगाव पोलिसांकडून यात्रेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच निरगुडसर आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

यात्रेत यंदा सलग सुट्ट्यांमुळे उच्चांकी गर्दी होणार असून गडावर स्टॉल,हॉटेल आदी दुकानाची संख्या वाढली असल्याची माहिती श्री क्षेत्र थापलींग खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT