Police 
पुणे

पोलीस कारवाईत अब तक छप्पन 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - शुक्रवारी पहाटे निगडीतील ओटा स्किम परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून शुक्रवारी पहाटे निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओटास्कीम परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. 

ओटा स्कीम परिसरातील १२९ गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या यादीतील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी ३०९ पोलीस आणि ५५ अधिकारी यांनी शुक्रवारी पहाटे ओटा स्किम परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी तब्बल ५६ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.

खंडणी विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, तसेच बारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केल्याने शहरातील गुन्हेगारांची एकच पळापळ सुरू झाली आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

द ग्रेट खलीच्या कारचा अपघात; अशी झाली अवस्था, व्हिडीओ शेअर करत सांगितलं काय घडलं

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

खिशात फक्त 20 पैसे, तीन दिवस उपाशी… जावेद अख्तरांनी सांगितला मुंबईतील संघर्षाचा काळ, म्हणाले...

SCROLL FOR NEXT