पुणे

ई-कचऱ्यावर सुचविले ७५६ नागरिकांनी उपाय

सकाळवृत्तसेवा

पुणे  - वाढत्या ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या योजना, उपाय करता येतील याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याच्या मुदतीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड आयटी’कडून या सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७५६ नागरिकांनी त्यांचा प्रतिसाद संकेतस्थळावर नोंदविला आहे. 

इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांसह अन्य वस्तूंचा समावेश इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यामध्ये होतो. या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान सध्या सरकारपुढे आहे. ई-कचरा गोळा करण्यामध्ये आणि त्याच्या पुनर्वापरासाठी प्रक्रिया करण्याच्या कामात असंघटित क्षेत्रातील, विशेषतः लहान मुलांचा, कामगारांचा वापर  केला जातो.

असंघटित क्षेत्रामधून तब्बल ९५ टक्के ई-कचरा गोळा केला जातो. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील पर्यावरणीय धोके या विषयाबाबत जनजागृती करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स खात्यातर्फे उपक्रम राबविले  जात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Narendra Dabhokar Case : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : हायकोर्टाकडून सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

Mira Road Hit And Run: भरधाव एसयूव्हीनं चौघांना उडवलं, घटनेनंतर पलायन, डॅशकॅम VIDEO VIRAL

World Breast Cancer Research Day: ‘या’ ५ कारणांमुळे तरुण महिलांमध्ये वाढू शकतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका!

'नाटकाच्या स्टेजवरच वाढदिवसाचं सेलिब्रेशन' प्रेक्षकांचं खास सरप्राईज पाहून नीना कुलकर्णी झाल्या थक्क, Viral Video

Marathi News Updates : दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला जामीन

SCROLL FOR NEXT