bhama askhed 
पुणे

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या भामा आसखेड धरणात एवढा पाणीसाठा

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्‍यासह शिरूर आणि दौंड तालुक्‍याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात गुरुवारी सकाळी सहापर्यंत 56.76 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अत्यंत कमी असून, गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात 98.58 टक्के पाणीसाठा होता. 

भामा आसखेड धरण भरण्यास या वर्षी उशीर होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा होतो की नाही, याबाबत बळिराजाला चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी आहे. खेडच्या पश्‍चिम भागात भामा आसखेड हे मातीचे धरण आहे. चालू वर्षी एक जूनपासून धरण क्षेत्रात 464 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात 27 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात सध्या 4.83 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे ,तर जिवंत पाणीसाठा हा 4.35 टीएमसी इतका आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Crime News: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

SCROLL FOR NEXT