Pune-Police 
पुणे

कोरोनाशी लढा देताना सहायक पोलिस उपनिरीक्षकास वीरमरण; पुणे पोलिस दलातील पहिली घटना!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर पोलिस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीकावर कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. सोमवारी (ता.४) दुपारी दोन वाजता भारती विद्यापीठ रुग्णालयात पोलिसाचा मृत्यू झाला.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले दिलीप पोपट लोंढे (वय ५८) यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी दुपारी दोन वाजता त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

लोंढे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, असेही वेंकटेशम यांनी सांगितले. दरम्यान, लोंढे यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. पुणे पोलिस दलामध्ये कोरोनामुळे मृत्यु होण्याची ही पहिलीच घटना आहे.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT