Corona-patient Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५ हजार ८५० नवीन कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील दहा दिवसांपासून सातत्याने झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील दहा दिवसांपासून सातत्याने झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या मागील दहा दिवसांपासून सातत्याने झपाट्याने कमी होऊ लागली आहे. दहा दिवसांपूर्वी ९३ हजार ६४२ वर पोचलेली ही संख्या बुधवारी (ता.२) पन्नास हजारांच्या आत आली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या एकूण ४६ हजार ७१० सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल साडेबारा हजार सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारी अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५ हजार ८५० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, ११ हजार ३९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यू आहेत. बुधवारी दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ८४६ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ६९६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ३४, नगरपालिका हद्दीत २१० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार५२१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ४९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ८३१, नगरपालिका हद्दीतील ३७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १७४ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT