Pune 
पुणे

पुण्यात कोंढव्याची पुनरावृत्ती; आंबेगावमध्ये सीमाभिंत पडून 6 मजुरांचा मृत्यू

सचिन कोळी

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावल्याची घटना आंबेगाव परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. कोंढवा परिसरात शुक्रवारी सिमाभींत पडून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांत ही घटना घडली आहे.

अग्निशामक दलाने एकूण नऊ जणांना तिथून बाहेर काढले. सहा जणांचा मृत्यू झाला असून चार पुरुष, दोन महिला यांचा त्यात समावेश आहे. तर तीन जण जखमी आहेत. भारती विद्यापीठाच्या अंतर्गत आंबेगाव पोलिस चौकी शेजारी घटना घडली आहे. ही भिंत खाली दगडी बांधकाम त्यावर सिमेंटच्या विटा त्यावर लोखंडी जाळी पंधरा फूट उंचीची भिंत होती. जमिनीत पावसाचे पाणी मुरल्यामुळे जमिनीचा भाग फुगला आणि भिंत पडली. सुमारे 40 फूट लांबीची ही भिंत पडलेली आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी पोचताच त्यांनी घन पोगर याने मदत कार्य सुरू केले. त्यानंतर एक जेसीबी आला जेसीबीला येण्यासाठी रस्ता नव्हता. येथील पत्र तोडून तो घटनास्थळी पोहोचला. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून अग्निशामक दलाला मदत कार्य पाहिजे असल्याचा फोन आल्यानंतर अग्निशामक दलाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. कात्रज-सिंहगड एरंडवाना कोथरूड मध्यवर्ती कार्यालय क्यू आर टी च्या दोन गाड्या असा मोठा ताफा या ठिकाणी मदतकार्यात होते. मदतकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले -
- संबंधित घटना नैसर्गिक आणि मानवी चुका या दोन्हींमुळे
- मृतांपैकी ४ रहिवासी छत्तीसगड तर २ मध्यप्रदेशचे
- कोंढवा घटनेनंतर २७८ साईट्सची पाहणी पूर्ण
- बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांना कामगारांना योग्य सुविधा पुरवण्याचे आदेश दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT