Savitribai Phule Pune University sakal
पुणे

Savitribai Phule Pune University : प्राध्यापक भरतीसाठी ६००० उमेदवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी जवळपास सहा हजार उमेदवार रिंगणात असणार आहेत. शुक्रवारी (ता. १६) रात्री बारापर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी जवळपास सहा हजार उमेदवार रिंगणात असणार आहेत. शुक्रवारी (ता. १६) रात्री बारापर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पाच हजार ८९० उमेदवारांनी शुल्कासह अर्ज भरल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विद्यापीठातील प्राध्यापक भरती होत आहे. विविध विभागांमध्ये १११ पदांसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत १० हजार १७४ उमेदवारांनी नोंदणी केली असली तरी त्यातील शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सहा हजार ३२९ उमेदवारांनी पूर्ण अर्ज भरला होता.

मात्र यातील पाच हजार ८९० उमेदवारांनी शुल्कासह अर्ज सबमिट केला होता. काही उमेदवारांनी अर्जात चुका झाल्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे आत्ताच अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची संख्या निश्चितपणे सांगता येणार नाही. विद्यापीठाकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे, अशा उमेदवारांच्या अर्ज आणि कागदपत्रे येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT