6000 km telescope led by India 
पुणे

भारताच्या नेतृत्वात ६००० किलोमीटरची दुर्बीण

पुण्यातील ‘जीएमआरटी’सह इटली, नेदरलॅंड व रशियाच्या शास्रज्ञांचा सहभाग

सम्राट कदम

पुणे - अवकाशीय घटकांच्या निरीक्षणासाठी शास्रज्ञ काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्रज्ञांनी रशिया, नेदरलॅंड आणि इटलीतील रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने एका ‘क्वेसार’चे निरीक्षण केले आहे. त्यामुळे जगात प्रथमच अवकाशीय घटकाच्या निरीक्षणासाठी तब्बल सहा हजार किलोमीटरची आधाररेषा वापरण्यात आली आहे.

काय आहे संशोधन?

अब्जावधी प्रकाशवर्षे दूरवरच्या अवकाशीय घटकांच्या निरीक्षणासाठी शास्रज्ञ रेडिओ दुर्बिणींचा वापर करतात. निरीक्षण घेणाऱ्या दुर्बिणींमधील अंतर जेवढे जास्त तेवढी प्रतिमा अधिक स्पष्ट मिळते. (रिझॉल्यूशन वाढते) एनसीआरएच्या शास्रज्ञांनी नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) सह इटलीतील ‘मेडिसीना’ आणि ‘नोटो’, नेदरलॅंड मधील ‘वेस्टरबोर्क’ आणि रशियाच्या ‘झेलेनचुकस्काया’ अशा पाच दुर्बिणींचा एकत्र वापर केला आहे. त्यामुळे तब्बल सहा हजार किलोमीटरची आधाररेषा मिळाली असून, आजवरची सर्वाधिक कोनीय स्पष्टता (ॲग्यूलर रिझॉल्यूशन) प्राप्त झाली आहे.

कसे झाले संशोधन ?

- पृथ्वीपासून १२.३ अब्ज प्रकाशवर्षे दूरवरच्या ३C४५४.३ या क्वेसारची निवड

- १४ फेब्रुवारी २०२२ ला एकाच वेळी वरील पाच दुर्बिणीतून याची निरीक्षणे घेण्यात आली

- पाच दुर्बिणींमुळे ३ते १० मिलीआर्कसेकंदची स्पष्टता (रिझॉल्यूशन) मिळाली. ज्याद्वारे चंद्रावरील एखादी इमारतही येथून स्पष्ट दिसू शकते.

- विविध कोनांतून निरीक्षणे घेतल्यामुळे प्रथमच सर्वाधिक दूरस्थ स्पष्टतेची प्रतिमा प्राप्त

संशोधनात विशेष काय?

- जगात प्रथमच पाच रेडीओ दुर्बिणी एकत्र येत सहा हजार किलोमीटरची आधाररेषा निरीक्षणासाठी वापरली

- एकापेक्षा अधिक दुर्बिणीच्या वापरातून कोनीय स्पष्टता अधिक मिळत असल्याचे सिद्ध

- एनसीआरएच्या प्रा. प्रीती खरब, डॉ. विश्वेश मारथी या भारतीयांच्या नेतृत्वात हा प्रयोग

- जीएमआरटी आणि युरोपियन व्हीएलबीआय नेटवर्क (ईव्हीएन)मधील दुर्बिणी या पुढेही असे प्रयोग करणार

- अवकाशीय घटकांची कोनीय स्पष्टता वाढल्यास निरीक्षणाबरोबच पुढील संशोधनास उपयोग

क्वेसार म्हणजे काय?

अवकाशामध्ये अशी अनेक ठिकाणे शोधण्यात आली आहेत. जेथून फक्त रेडिओ लहरी येतात परंतु प्रकाश नसल्याने त्या डोळ्यांना दुर्बिणीद्वारे दिसत नाहीत. दीर्घीकांच्या केंद्रकातील कृष्णविवरातून त्याला ऊर्जा पुरविली जाते. अशा घटकांना ‘क्वेसार’ असे म्हणतात.

क्वेसारच्या या स्रोताची ईव्हीएन दुर्बिणीतून घेतलेली प्रतिमा आणि जीएमआरटी सोबत घेतलेली प्रतिमा यातील फरक सर्व काही स्पष्ट करतो. पाच दुर्बिणीच्या सह्याने मिळवलेली प्रतिमा अधिक स्पष्ट असून, या पुढे अशा आंतरराष्ट्रीय सहयोगाचे नवे दालन खुले करत आहे.

- प्रा. प्रीती खरब, शास्रज्ञ, एनसीआरए.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT