Corona Vaccine
Corona Vaccine Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात ६२ टक्के नागरिक लशीविना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरासह जिल्ह्यात (Pune District) आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार (३८ टक्के) नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. त्यापैकी ५ लाख ६६ हजार ८३६ (११ टक्के) नागरिकांना लसीचा दुसरा डोस (Second Dose) मिळाला आहे. तर, सुमारे ३२ लाख १६ हजार (६२ टक्के) नागरिक अद्याप लसीच्या प्रतीक्षेत आहेत. (62 Percent Citizens in Pune District without Vaccine)

Vaccination

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील लोकसंख्या एक कोटी १७ लाख आहे. त्यापैकी लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थींची संख्या ५१ लाख ७५ हजार इतकी आहे. पुण्यात लसीचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वी लसीकरणाने चांगला वेग घेतला होता. राज्यात कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. पुणे जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला. तर, तर ११ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

  • ६९९ जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे

  • ५१,७४,७७१ अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या

  • १९,५८,०६५ पहिला डोस (३८ टक्के)

  • ५,६६,८३६ दुसरा डोस (११ टक्के)

ज्येष्ठांचे ८० टक्के लसीकरण

जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांचे ८० टक्के लसीकरण झाले आहे. ज्येष्ठांची संख्या दहा लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी ७ लाख ८० हजार ५१८ ज्येष्ठांना लसीचा पहिला डोस मिळाला असून २ लाख ६७ हजार २८२ ज्येष्ठांना दुसरा डोस देण्यात आला. लशीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५० हजार नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.

प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न केले. ज्या केंद्रांवर सुरुवातीच्या कालावधीत लसीकरण जास्त झाले, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा झाला. जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ८५ हजारपर्यंत लसीकरणाचा टप्पा गाठला आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT