62nd maharashtra kala exhibition google
पुणे

Pune News : ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन

या वर्षी प्रदर्शनासाठी राज्यातील ४४२५ विद्यार्थ्यांनी एकूण ६५१७ कलाकृती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी विभागाचे ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रदर्शनासाठी राज्यातील ४४२५ विद्यार्थ्यांनी एकूण ६५१७ कलाकृती राज्य कला प्रदर्शनासाठी पाठवून प्रतिसाद दिला आहे.

अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मिश्रा म्हणाले, ‘‘कला संचालनालय असलेले महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य असून संचालनालयातर्फे शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित कला संस्थांमध्ये विविध कलाविषयक अभ्यासक्रम राबविले जातात.

या शिक्षणाचा लाभ घेणाऱ्या कलेच्या विद्यार्थ्यांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने विद्यार्थी विभागासाठी शासनातर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जाते.

या प्रदर्शनात सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी एकूण ६५१७ कलाकृती राज्य प्रदर्शनासाठी पाठविल्या. त्यातून ८०२ कलाकृतींची निवड करण्यात आली. दरम्यान हे प्रदर्शन येत्या गुरुवारपर्यंत (ता. ९) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सातारा रस्ता येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT