पुणे

#PmcIssue रस्त्यांवर नव्हे, डांबर कागदावरच

ज्ञानेश सांवत

पुणे - शहरातील रस्त्यांवर यंदा खड्डे पडले नसल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने गल्लीबोळातील रस्त्यांना मात्र चारच महिन्यांत तब्बल ६३ कोटी रुपयांचे डांबर फासल्याचे उघड झाले आहे. काही मोजक्‍याच प्रभागांमधील रस्त्यांची डागडुजी करीत, संपूर्ण डांबरीकरण केल्याच्या नोंदी दाखविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मात्र ही कामे कधी आणि कोणी केली, याचा थांगपत्ताही संबंधित खाते लागू देत नाही. त्यामुळे रस्त्यांचा निधी हा अधिकारी आणि ठेकेदारांकरिता मंजूर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे कागदोपत्री डांबरीकरणाची नगरसेवकांना कल्पना नसावी, हेही आश्‍चर्यकारकच आहे.

महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ६३ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. गरजेनुसारच कामे केली जातील, असे तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले. त्याकडे दुर्लक्ष करीत, पावसाळी कामांचे कारण पुढे करीत, पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सरसकट डांबरीकरण केल्याचा हिशेब मांडला आहे.

पावसाळ्यात गेल्या तीन महिन्यांत बहुतांशी भागातील रस्त्यांवर खड्डे पडले. त्याबाबत दीडशेहून अधिक जणांनी तक्रारी नोंदविल्या. तरीही, खड्डे कुठेच नसल्याचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याबाबतची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने मांडली. त्यानंतर मात्र रस्ते दुरुस्तीची मोहीम राबविली, तर काही भागांतील रस्त्यांची जबाबदारी अन्य यंत्रणांकडे असल्याचे सांगून महापालिकेने हात झटकले होते. तेव्हाच, स्वारगेट परिसरातील रस्त्यांच्या कामांची जबाबदारी असलेले राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिसाद देत नसल्याचा कांगावाही करण्यात आला आहे. परंतु, आपल्या हद्दीतील रस्त्यांवर वरवरचे डांबर फासून संपूर्ण डांबरीकरणाची बिले काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

कामे घाईगडबडीत 
खराब झालेले रस्ते दुरुस्त केल्याचे दाखविण्यासाठी घाईगडबडीत कामे करण्यात आली. ती निकृष्ट दर्जाची झाल्याचे उघडही झाले. डागडुजीनंतर काही तासांमध्ये रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याची उदहारणे आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील खडीमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या. अशा घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने ही बाब गंभीर्याने घेतली नाही. 

रस्त्यांच्या कामांसाठी वर्षाकाठी ठराविक निधी असतो. त्यातून आवश्‍यक ती कामे करण्यात आली आहेत. ज्या कामाच्या नोंदी आहेत, त्याच स्वरूपाची कामे झाली आहेत.  
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख (प्रभारी) पथ विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT