Dr. Ashish Nerlekar sakal
पुणे

Pune News : माळरानांवरील ६५ वनस्पती होताहेत नष्ट; ‘मिशिगन’चे डॉ. आशिष नेर्लेकर यांचे संशोधन

माळरानावर शेती किंवा चुकीच्या वनीकरणामुळे ६५ स्थानिक वनस्पती नष्ट होत असल्याची गंभीर बाब संशोधनातून समोर आली आहे.

सम्राट कदम

पुणे - माळरानावर शेती किंवा चुकीच्या वनीकरणामुळे ६५ स्थानिक वनस्पती नष्ट होत असल्याची गंभीर बाब संशोधनातून समोर आली आहे. केवळ जंगलतोडच नाही, तर गवताळ प्रदेशातील मानवी हस्तक्षेप आणि पडीक जमीनही जैवविविधतेला धोकादायक ठरत असून, वेळीच धोरणात्मक उपायांची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रेसिंडंट पोस्ट डॉक फेलो असलेले डॉ. आशिष नेर्लेकर यांच्या नेतृत्वात संशोधन झाले आहे. मूळचे पुण्यातील नेर्लेकर यांनी २०२१च्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांतील गवताळ प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधन प्रसिद्ध केले आहे.

नेर्लेकर सांगतात, ‘जंगलांवरील मानवी हस्तक्षेपाविरोधात आपण सर्वच सजग आहोत. पण, माळरानावर झालेल्या मानवी हस्तक्षेपाला आपण फारसे गांभीर्याने घेत नाही. तेथील वनीकरण असो किंवा शेतीखाली आणलेली जमीन, एवढेच काय पडीक पडलेल्या जमिनीमुळेही स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे.’

जैवविविधतेच्या संवर्धनासाठी माळरानांसंबंधीही धोरणात्मक पावले उचलण्याची गरज नेर्लेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे संशोधन ‘ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटी’ या प्रतिष्ठीत शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. संशोधनात आविष्कार मुंजे, प्रणव म्हैसाळकर, अंकिता हिरेमठ, जोसेफ वेल्डमन यांचा सहभाग आहे.

असे झाले संशोधन

  • नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ६० माळरानांची निवड

  • नैसर्गिक माळरान, वनीकरण, शेती आणि पडीक जमीन अशा चार प्रकारांतील प्रत्येकी एक चौरस मीटर भू-भागाची संशोधनासाठी निवड

  • मिळालेल्या प्रत्येक जागेतील वनस्पतींचे विश्लेषण केले

  • चारही प्रकारांतील स्थानिक वनस्पतींचा तुलनात्मक अभ्यासातून निष्कर्ष मांडले.

निष्कर्ष

  • माळरानांवरील वनीकरणामुळे १२ पैकी तीन आणि शेतीमुळे १२ पैकी सहा स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात

  • माळरानावरील कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे सरासरी ६५ स्थानिक प्रजाती नष्ट होतात

  • कुरकुंडी आणि कंदील फुलासारख्या दुर्मिळ किंवा अतिधोकादायक स्थितीतील प्रजातींनाही धोका

  • शेती करून पडीक पडलेली जमिनीत उपद्रवी तणांची वाढ होते

  • गवताळ प्रदेशात आग लागणे आणि शेळ्या-मेंढ्यांचे कुरण करणे जैवविविधतेसाठी फायद्याचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

Amravati Accident : भीषण अपघात ! चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन ७० फूट दरीत कोसळले, चार जण जागीच ठार

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

T20 WC, IND vs SA: 'पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण...', सूर्यकुमारने द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे काय सांगितले कारण?

Healthy Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी, सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा 'छोले सॅलड', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT