Dimbhe Dam Sakal
पुणे

डिंभे धरणात ६.५० टक्केच पाणीसाठा शिल्लक

कुकडी प्रकल्पातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीक्षमता ३० टीएमसी असून या धरणातील दि. ७ जून रोजी सकाळी ६ वाजता शिल्लक पाणीसाठा ८.२४ टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

कुकडी प्रकल्पातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीक्षमता ३० टीएमसी असून या धरणातील दि. ७ जून रोजी सकाळी ६ वाजता शिल्लक पाणीसाठा ८.२४ टक्के आहे.

फुलवडे - कुकडी प्रकल्पातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीक्षमता ३० टीएमसी असून या धरणातील दि. ७ जून रोजी सकाळी ६ वाजता शिल्लक पाणीसाठा ८.२४ टक्के आहे. या धरणाच्या पाण्यामुळे पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळत असून आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असतो. या प्रकल्पातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या डिंभे ता. आंबेगाव धरणात आज ६.५० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग मंचर येथील उपअभियंता डी. एस. कोकणे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पातील धरणांचा शिल्लक पाणीसाठा पुढीलप्रमाणे -

  • येडगाव ३७.५१ टक्के (०.७२ टीएमसी)

  • माणिकडोह ७.५९ टक्के (०.७७ टीएमसी)

  • वडज ९.९९ टक्के (०.११ टीएमसी)

  • पिंपळगाव जोगा - ९.५० टक्के (०.३६ टीएमसी)

  • डिंभे ६.५० टक्के (०.८१ टीएमसी)

  • चिल्हेवाडी ६.८९ टक्के (०.०५ टीएमसी)

  • विसापूर ०.६८ टक्के (०.००६ टीएमसी)

  • घोड १.४४ टक्के ( ०.०७ टीएमसी)

  • एकूण - ८.२४ टक्के (२.४३ टीएमसी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT