Corona-Patient 
पुणे

पुणे जिल्ह्यात आज ६५६३ नवे कोरोना रुग्ण; ३९ रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.२७) दिवसभरात ६ हजार ५६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या ५४ हजार ९३२ झाली आहे. दिवसातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३ हजार ४६३  जण आहेत. शिवाय जिल्हयात आज ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्युंपैकी शहरातील सर्वाधिक ३० मृत्यू आहेत.

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ६९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १८, नगरपालिका क्षेत्रात २७८  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ११० रुग्ण सापडले आहेत. याशिवाय गेल्या २४ तासांत ४ हजार ५९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ५८४, पिंपरी चिंचवडमधील १ हजार २४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६७४ आणि नगरपालिका हद्दीतील ९८ जण आहेत. आज कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.

सद्यःस्थितीतील एकूण सक्रिय रुग्णांपैकी १२ हजार ३१३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. याशिवाय ४२ हजार ६१९ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३ हजार ५०३, पिंपरी चिंचवडमधील २ हजार ५४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३ हजार ७३८, नगरपालिका हद्दीतील २ हजार १३० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३९९ रुग्ण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT